रोहिणीकाकू,
वर्णन फारच छान.
विश्वमोहिनीने लेखिलेल्या पुढील प्रकाराची सुद्धा आठवण झाली.
"गौरी, गौरी कशाने आलीस?" ह्या प्रश्नाला गौरीतर्फे "सोन्यारुप्याच्या पावलांनी आले", "हिऱ्यामाणकांच्या पावलांनी आले", "सुखसमृद्धीच्या पावलांनी आले".
"इथे काय आहे?" असे विचारत असे, व त्याचे गौरीतर्फे उत्तर "उदंड आहे."
मीरा फाटक यांनी लिहिलेले सुद्धा आमच्याकडे नेहमीच घडते.