एखादा उप-उप-प्रतिसाद सोडला, तर मला स्वतःला अजून एकही फटका बसला नाहीये हे आधीच सांगायला हवं. तशी मी फुकटचे दाणे टिपायलाच येते, अंडी कमीच घातल्येत. 

आक्षेप घेणाऱ्यांचे काही विचार पटतात, काही नाही.

मनोगत हे प्रशासक त्यांच्या स्वखर्चातून आणि स्वप्रयत्नातून चालवतात याबद्दल नितांत आदर आहेच. मात्र त्याचबरोबर मनोगताला हे मनोहर रूप देण्यामागे त्यात सहभागी होणाऱ्या सदस्यांचाही महत्वाचा वाटा आहे आणि राहील हेही लक्षात ठेवायला हवं.

मनोगत प्रशासकांच्या मालकीचे असल्याने, त्यावर प्रकाशित होणाऱ्या साहित्य-प्रतिसादांचे निकष काहीही ठेवायचा त्यांचा अधिकार आहे. एवढंच नव्हे, तर ते बदलते ठेवण्याचाही अधिकार आहे.

फक्त या निकषांची पूर्वकल्पना सदस्यांना देण्यात यावी अशी माफक अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे? अमुक अमुक प्रकारचं लिखाण मनोगतावर निशिद्ध आहे, असं आधीपासूनच ठाऊक असलं, तर पैसा नाही, पण वेळ आणि श्रम खर्च करून साहित्य-प्रतिसाद लिहिणाऱ्या सदस्यांना बडग्याचा प्रसाद आणि मनस्ताप टाळता येणार नाही का?

- कोंबडी