ह्या भागाच्या लेखनात पूर्ण स्पष्टता नाही असे वाटते, त्याबद्दल क्षमस्व.
बाळाशी खूप बोलत रहावे म्हणजे ते नवनवीन शब्द शिकते हे बरोबर आहे, पण मनुष्यातला भाषेचा उगम होण्याचे ते कारण नाही. शब्दांचे आकलन करण्याचा एवढा प्रगत प्रोग्रॅम हा फक्त मानवी मेंदूत आहे.
भाषा येण्याची प्रमुख अशी दोन कारणे आहेत.
१ . आपण सर्वजण एका जैविक प्रोग्रॅमने भाषेची सुरुवात करतो, जे नैसर्गिक आहे.
२. ही भाषा फक्त शब्दसंपन्न अशा सहवासाने वाढते. पण निर्माण होत नाही.
३. जी मुले ऐकू शकत नाहीत, त्यांच्या मेंदूपर्यंत अशा शब्दांचे उच्चार जात नाहीत, त्यामुळे मेंदूकडून संदेश येत नाही व तोंड व घसा यांचा उपयोग ते पालकांसारखे शब्द उच्चारण्यास करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची शब्दसंपत्ती वाढत नाही, पण नैसर्गिकरित्या ते काही ध्वनी काढू शकतात, तीच त्यांची भाषा, पण ती मुले पाहू शकतात, मेंदू त्या हालचालींचे ग्रहण व आकलन करतो म्हणून ती खाणाखुणांनी बोलू लागतात.
काही छोटी मुले पाळीव प्राण्यांबरोबर तर काही पाळीव प्राण्यांची पिल्ले माणसांबरोबर ठेवली तर माणसाचे मूल प्राण्याचे आवाज काढते असे आढळले पण अर्थातच मेंदूची क्षमता कमी असते म्हणून प्राण्याचे पिलू माणसासारखे बोलू शकत नाही, पण ते ठराविक शब्दाचा अर्थ जाणून कृती करू शकते.