(प्रियालीताईंप्रमाणेच) माझेही कित्येक प्रतिसाद उडवले गेले असतील, पण who cares? चौकार-षट्कार होते की नाही हा भाग अलाहिदा*, पण कितीही झालं तरी तो फुकट्या 'स्वयं-प्रकाशी'पणा होता. त्यामुळे (या स्थळाच्या अधिकृत मालकांनी) तो उडवला, तर त्यात काय विशेष?
(*'ते काळच ठरवेल' असे लिहून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा मोह अनावर होत होता, पण प्रतिसादच शिल्लक राहिले नाहीत तर काळ काय ठरवणार आणि कसा, हे लक्षात आल्याने हात आवरता घेतला.)
इथे प्रतिसाद लिहिणे हे माझे prerogative (मराठी?) आहे; प्रतिसाद उडवणे हे प्रशासकांचे. उडवल्याबद्दल बोंबाबोंब करणे हे माझ्या हातात; ती बोंबाबोंब इथे टिकू द्यायची की नाही, हे प्रशासकांच्या. असे division of prerogatives केले, तर it seems to be a fair game!
Being (allowed to be) here is a privilege, not a right हेही ठीकच.
मात्र,
यामुळेच त्यांना जे योग्य वाटेल ते ते ठेवतील उरलेले उडवतील, स्थलांतरित करतील.
उडवण्याला (कितीही वाईट वाटले तरी) किंवा स्थलांतरित करण्याला काहीच आक्षेप नाही हो! पण बऱ्याच वेळा प्रतिसादात नेमके काय म्हणायचे आहे हेही लक्षात न घेता प्रतिसाद edit केले जातात. त्याने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, आणि worse than that, it is tantamount to putting words in one's mouth. एक वेळ प्रतिसाद पूर्णपणे उडवला तर दुःख नाही, पण माझ्या वतीने माझा प्रतिसाद लिहिणे, त्यायोगे मला जे म्हणायचे नाही ते (मला नेमके काय म्हणायचेय ते न समजल्यानेही असेल कदाचित... प्रत्येक वेळी मला काय म्हणायचेय ते इतरांना समजेलच अशी अपेक्षाही नाही आणि समजलेच पाहिजे असा आग्रहही नाही...) मला म्हणायला लावणे, हे कितपत योग्य आहे?
माझाही एक(च) प्रतिसाद प्रशासकांनी उडवला होता व त्याचे स्पष्टीकरणही न मागता स्वतःहून कळवले होते.
आणि
(प्रत्येकवेळी ते त्याचं सुयोग्य स्पष्टीकरण देतात असं मला वाटतं)
Exceptions don't make the rule एवढेच नम्रपणे सुचवावेसे वाटते.
अर्थात, स्पष्टीकरण द्यायला प्रशासक बांधील नाहीत, हेही तितकेच खरे. ("'I don't owe the world an explanataion!' हे काय फक्त माझेच ब्रीद असावे की काय?" असे [स्वतःची जाहिरात करण्याचा प्रमाद पत्करून] विचारावेसे वाटते.)
(उलटपक्षी, स्पष्टीकरण दिले तरी फारसे बिघडणार नाही, असेही वाटते. असो.)
ज्यांना जायचंय ते खुशाल जाऊ शकतात
हे मात्र खरे. ज्यांना जायचे आहे, त्यांना प्रशासकांच्या, माझ्या किंवा तुमच्या परवानगीची गरज नसावी. त्यांना तसे अधिकृतरीत्या जाहीर करण्याची(ऑफिशियल राजीनामा देण्याची)ही गरज नसावी.
घरातील कर्त्या माणसाचा एखादा निर्णय आवडला नाही तर एकवेळ आपण निषेध नोंदवू शकतो पण कर्त्या माणसाच्या त्याच्याच घरातील वागण्याला लुडबुड म्हणू शकत नाही.
याला अनेक आक्षेप आहेत.
१. 'कर्ता माणूस', 'हिंदू अविभक्त कुटुंब', 'राष्ट्रपती' (किंबहुना 'राष्ट्रपिता'सुद्धा) वगैरे संकल्पना मला व्यक्तिशः पटत नाहीत; पण एक वेळ ते माझे वैयक्तिक मत (आणि कदाचित विषयांतर) म्हणून तूर्तास सोडून देऊ या.
२. माझा वरील १. मधील आक्षेप तूर्तास बाजूला ठेवून 'कर्ता माणूस' ही संकल्पना या चर्चेपुरती जरी मानली, तरी कर्त्या माणसाच्या त्याच्याच घरातील वागण्याला घराबाहेरील लोक लुडबुड म्हणू शकत नाहीत; घरातील/कुटुंबातील माणसांची त्याबद्दल मते (आणि वागणुकीबद्दल अपेक्षासुद्धा) असू शकतात.
३. याउलट, मनोगती मंडळी ही घरातील/कुटुंबातील माणसे नाहीत, असे जर मानले, तर आपली 'कर्ता माणूस' ही संकल्पनाच मुळात या संदर्भात आपोआप कचऱ्याच्या पेटीत जाते.
ते आपले इतर व्याप सांभाळून आणि वेळोवेळी सुधारणा करुन स्वखर्चाने मनोगत चालवत आहेत.
एकदम रास्त. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी, आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
आणि मनोगती मंडळीसुद्धा आपापले व्याप सांभाळून मनोगतावर वावरून एका अर्थाने मनोगत 'चालवत'च आहेत की!
चांगलेच आहे. 'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या भावनेने चालले आहे, तोपर्यंत आनंदच आहे. पण म्हणून कोणीही कोणाला आपल्या कातड्याचे जोडे करून घालण्याचीही गरज आहे, असे वाटत नाही.
- टग्या.