प्रामाणिक अनुभवकथन आवडले. लेखातले आकडे मराठीतून असायला हरकत नसावी.
===
अशीच एक आठवण-
मी चौथी-पाचवीत असतानाची गोष्ट. दिवाळीत उरलेल्या आणि मराविमंच्या कृपेने अनेक संपलेल्या मेणबत्त्यांचे मेण गोळा झाले होते. त्यातून मी एक मोठी मेणबत्ती तयार करायचे ठरवले. मातीचा साचा करायचा, त्याच्या मध्यभागी दोरा धरायचा आणो गरम मेण ओतायचे की झाली मेणबत्ती...मला हे फारच सोपे वाटत होते.
एका पुठ्ठ्याच्या खोक्यात बागेतली मातीचा चिखल भरला, त्याच्यामध्ये धुण्याची काठी मधोमध खुपसली, झाला साचा तयार.
साचा पुरेसा वाळल्यावर. त्याच्या मधोमध जाड दोरा धरला. स्वयंपाकघरातून मेण वितळवून आणले, न भाजून घेता व्यवस्थित ओतले. मेण संपूर्ण गार होईपर्यंत थांबलो. आता साचा तोडायचा आणि छान रंगीत मेणबत्ती तय्यार!
कसलं काय!? मेणबत्ती झाली, पण ती नखशिखान्त दमट चिखलाने बरबटली होती. माती सर्व बाजूने मेणात रुतली होती.
साचा पूर्ण न वाळवल्यामुळे असे झाले असावे हे मला अभियांत्रिकीला आल्यावर समजले.