इथे प्रतिसाद लिहिणे हे माझे prerogative (मराठी?) आहे; प्रतिसाद उडवणे हे
प्रशासकांचे. उडवल्याबद्दल बोंबाबोंब करणे हे माझ्या हातात; ती बोंबाबोंब
इथे टिकू द्यायची की नाही, हे प्रशासकांच्या.
सातीताईंचे कर्ता पुरुष वगैर काही पटत नाही. आपण आपले काम करावे. प्रशासक आपले बघतील. भूतकाळात आम्ही आपले 'काम' केले आहे. प्रशासकांनी ते न सांगता कधी 'उडवले' आहे, तर कधी बंद पाडले आहे. म्हणून आम्ही आपले 'काम' बंद करणार नाही.
हे मात्र खरे. ज्यांना जायचे आहे, त्यांना प्रशासकांच्या, माझ्या किंवा
तुमच्या परवानगीची गरज नसावी. त्यांना तसे अधिकृतरीत्या जाहीर
करण्याची(ऑफिशियल राजीनामा देण्याची)ही गरज नसावी.
असे असले तरी मनोगतावर अभिनंदन करतो तसा काहींना शोकही करता येईल, हे विसरता काय? वेगळे लेख टाकता येतील. "काक्का, माम्मा जाऊ नका ना, प्लीज!!" टाइपचे.
मला वाटतं प्रशासन आणि कंपूबाजी हे विषय आता चावून चोथा झाले आहेत. ह्या शिवाय दुसरे विषय नाहीत काय चर्चेला?
प्रशासकांचा प्रतिसाद म्हणजे ज्ञानपीठ नसले तरी प्रशासकांनी कुठल्याही नव्या सदस्याच्या पहिल्या लेखनाला त्यांचे ऑटोजनरेटेड 'वाव्वा, छान, उत्तम' प्रतिसाद पोचतील ह्याची व्यवस्था व्हावी.
पण म्हणून कोणीही कोणाला आपल्या कातड्याचे जोडे करून घालण्याचीही गरज आहे, असे वाटत नाही.
बरोबर. जोडे पीवीसीचे चालतील काय? हलके असतात.
शिवाय काहींनी पोट आहे म्हणून ते दुखायलाच हवे काय1, ह्या गोष्टीवरही विचार करावा. बाय द वे, 'प्रवासी कोण' नंतर आता 'प्रशासक कोण आणि किती' ही चर्चा हिट होताना दिसते आहे.
चित्तरंजन
1. एका मनोगतीकडून साभार