जयंतराव,
गझलेतील भाव छान आहेत. एकूण कल्पना आवडली. विशेषतः पुढील शेर सगळ्यात जास्त आवडले -
अत्तराचे काय आता काम आहे?
माझिया श्वासात तू भिनलीच आहे
रंगली ही स्पंदनांची जुगलबंदी
आणि लय गात्रातली चढतीच आहे
पण पूर्ण गझल पुन्हा एकदा वाचल्यावर मला यात आणखी सहज़ता यायला हवी होती असे वाटून गेले. चू. भू. द्या. घ्या. शब्दांच्या क्रमातील फ़ेरफ़ार किंवा पर्यायी शब्दयोजनेतून हे साधता येईल/आले असते असे वाटते.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुमचा गझललेखनाचा प्रवास आता अधिक रंगतदार होतोय अशी आशा करायला हरकत नाही.