एखादी मुलगी दिसायला सामान्य असेल पण जर उपलब्ध प्रसाधन सामुग्रीचा योग्य वापर करून ति नीटनेटकी राहत असेल तर नक्कीच त्या मुलीच्या beauty sence (माफ करा याला मराठी शब्द सुचत नाहीये) ला मानलं पाहिजे.  "जातीचीच सुंदर असून नीट न राहणारी" म्हणजे नक्की कशी? तुम्हाला जर "गबाळी" अस म्हणायचं असेल तर कोणालाही अशी व्यक्ती मग ति मुलगी असो किव्हा मुलगा आवडत नाही (कमीतकमी प्रथम दर्शि तरी नक्कीच नाही)

         "सुंदर " या शब्दाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीनुसार वेगेवेगळी असू शकते. सुंदर मुलीची स्तुती हि नेहमी होते यात वाद नही . नीटनेटक्या आणि गबाळ्या व्यक्ती मध्ये कधीही नीटनेटकी व्यक्ती जास्त आत्मविश्वास असणारी भासते. पण सुंदर व्यक्तीला जास्त सन्मान मिळतो किव्हा मिळावा हे म्हणणे मलातरी पटत नही. सन्मान हा व्यक्ती कशी दिसते किव्हा कशी राहते यापेक्षा किती चांगली व्यक्ती आहे यावर अवलंबून असत अस माझं मत आहे.

---कांचन.