*Devil' Advocate अशा अर्थाने नव्हे.

(जाता जाता मी कर्ता माणूस हा शब्द वापरला होता, "पुरुष" नव्हे. 'मनोगताची आर्थिक आणि प्रशासकीय जबाबदारी पेलणारे आणि एवढे मोठे कुटुंब प्रेमाने चालविणारे' या अर्थाने मी हे म्हटले आहे.)

माझ्या कल्पनेप्रमाणे हिंदू अविभक्त कुटुंबपद्धतीत कर्ता (इथेही कुटुंबाची जबाबदारी पेलणारा आणि कुटुंब चालवणारा - प्रेमाने or otherwise! - अशाच अर्थाने) हा सहसा पुरुषच असे. (अपवाद असल्यास मला कल्पना नाही.) त्यामुळेच "कर्ता पुरुष" हा शब्दप्रयोग प्रचलित झाला (असावा), आणि म्हणूनच तो चित्तोपंतांनी वापरला असावा.

"कर्ता" किंवा "कर्ता माणूस" यांऐवजी "कर्ता पुरुष" या शब्दसमूहाच्या वापरातून तुम्ही सुचवलेल्या अर्थाव्यतिरिक्त माझ्या माहितीत तरी दुसरा कोणताही अर्थ अभिप्रेत होत नाही. (चित्तोपंतांना किंवा इतर कोणालाही तो नसावा.) फक्त, कदाचित "कर्ता पुरुष" हा शब्दप्रयोग अधिक प्रचलित असल्यामुळे अधिक चटकन वापरला जातो, एवढेच सुचवावेसे वाटते.

- टग्या.