डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांचे मनःपूर्वक आणि सादर अभिनंदन.
डॉ. अभय बंगांचा "माझा साक्षात्कारी हृद्रोग" हे पुस्तक व काही लेख मी वाचले आहेत. विशेषतः अभय बंगांनी कॅनडात (की अमेरिकेत?) जागतिक मराठी संमेलनात केलेले भाषण मी एका दिवाळी अंकात वाचले होते. त्याने तर मी भारावूनच गेले. ह्या पतीपत्नींच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे. "कहाँ गये वो लोग!" असे मनात येऊन विषण्णता आलेली असताना बंगदांपत्याच्या आठवणीने दिलासा मिळतो.