मुलींचे नटणे, व्यव्स्थीत पोशाख घालणे, त्यांच्या आत्मविश्वासात नक्कीच भर घालते.
सहमत.

तुम्हाला मुलगी कशी दिसावी हा प्रकार कशास पाहिजे आहे?
जर फक्त काही ठिकाणी जिथे चेहराच बघितला जातो, उदा. जाहिराती/फक्त सुंदरता अनुभवण्यासाठी?
की खाजगी आयुष्यात, कार्यालय व कार्यक्रम अशा ठिकाणी?

जर जाहिराती बघाल तर सुंदर दिसणारे चेहरे चालतात.

परंतु बाकी ठिकाणी (उदा. वैयक्तिक ओळख असेल) तिथे सुंदरतेला जास्त सन्मान द्यावा असे मला वाटत नाही. कारण जरी सुंदर असून स्वभाव/वागणे पटणारे नसेल तर मग तिकडे कमी गुण जातील.

उदा. कार्यालयात जर काही कामाचे सादरीकरण असेल तिथे मुलीने नीटनेटके असणे फायद्याचे आहे. पण जर तिने जर दिलेले काम नीट केले नाही तर काय फायदा?

आणि मुख्यत्वे... फक्त मुलगीच का? मुले ही येतात कि ह्या प्रश्नात...