चित्त
द. भा. धामणस्कर डोंबिवलीला राह्तात व माझे त्यांच्याकडे नित्य येणे जाणे असते. धामणस्करांची कविता उच्च कोटीची,प्रगल्भ व आशयगर्भ आहे.'मौज'
मध्ये त्यांच्या कविता नियमीत येत व त्यासाठी 'मौज' चे संपादक सतत पाठपुरावा करीत असत. तुलनेने हा कवी अप्रसिध्द असला तरी त्यांची कविता
(विसाव्या शतकाची मराठी कविता) सारख्या संग्रहात अंतर्भूत होते यातच सव काही आले.
जयन्ता५२