योग्य तो मान राखून शर्ट, बॅग वगैरेवर ते चिन्ह लावले तर आकाश कोसळल्यासारखा गहजब होता कामा नये.
सहमत
अमेरिकेत हे स्वातंत्र्य आहेच शिवाय निषेध म्हणून अमेरिकन ध्वज जाळायलाही घटना मुभा देते. अगदी इतके नसले तरी आपण आपली आचारसंहिता थोडी शिथिल करायला हवी.
असहमत. आचारसंहिता शिथिल केली की त्यात मग पळवाटा काढून लोक सर्रास ध्वजाचा अपमान करू शकतील.
१५ ऑगस्ट नंतर फेरीवल्याकडून घेतलेले झेंडे दुसऱ्या दिवशी कचऱ्यात जातात हे मी इतके मनाला लावून घेऊ इच्छित नाही. १५ ऑगस्टला सामान्य माणूस ते कौतुकाने/आदराने मिरवतो हे मला जास्त महत्त्वाचे वाटते.
असहमत. कौतुक करून मिरविण्यासाठी इतर गोष्टीही आहेत. त्याकरीता ध्वज वापरू नये. जर झेंडे दुसऱ्या दिवशी कचऱ्यातच टाकायचे असतील तर मग १५ ऑगस्टलाही का उगाच दिखावा करायचा?