वर्णन आवडले, लिखाणात सहजता आहे. काहीवेळा विस्कळीतपणा जाणवतो. जसेः
मग थोडी घाई करुन दुसऱ्या एका गल्लीत राहणाऱ्या नानाला मी बोलावून घेतले. तो आणि मी जवळच एका शेतात जाऊन भल्या चांगली पिशवीभर काळी माती आणली. शाळेच्या दप्तराचीच होती ती पिशवी. आई ओरडू नये म्हणून मी ती नंतर गुपचूप धूणार होतोच. झाले माती आली. तोपर्यंत दीड वाजला होता. मग भराभर सर्व माती ओतून आम्ही चिखल तयार करण्याच्या कामाला लागलो.
अशी (ठळक वाक्ये) वाचता वाचता मध्येच लय बिघडवतात असे वाटते, आपले लिखाण चांगले आहे आणि मुख्यतः प्रामाणिक भावनांचे वर्णन त्यात सहज दिसते, ती सहजता कायम रहावी म्हणून हे सुचवावेसे वाटले.
चू.भू.द्या.घ्या.
पुढील लिखाणाकरता शुभेच्छा!