लेखन फार छान.
----------------------------------------------------------------
वरील प्रतिसादात नीलहंस म्हणतात,
आई ओरडू नये म्हणून मी ती नंतर गुपचूप धूणार होतोच. झाले माती आली. अशी (ठळक वाक्ये) वाचता वाचता मध्येच लय बिघडवतात असे वाटते,
यामध्ये मला असे वाटते की, अशा वाक्याने लेखकाचा वाचकाशी पटकन संवाद साधला जातो. अशी वाक्ये स्वगत असल्यासारखीच असतात आणि त्यामुळे वाचकाला मजा वाटते (माझा अनुभव). त्यामुळे अशी वाक्ये लय न बिघडवता उलट खुमारी वाढवतात असे मला वाटते. अर्थातच वाचन आणि रसग्रहण हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र अनुभव असल्याने चु. भू. द्या. घ्या.

बाकी आपले लिखाण चांगले आहे आणि मुख्यतः प्रामाणिक भावनांचे वर्णन त्यात सहज दिसते, या नीलहंसांच्या मताशी अतिशय सहमत.

पुढील लेखनास शुभेच्छा.
--लिखाळ.