कुंभाराबद्दल ज्ञानेश्वरांनी काय म्हटले आहे पहा.
एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेगाडगेयांचे निघती कोंभ ।
परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले की ॥ ७४ ॥ अध्याय ९, ज्ञानेश्वरी
अर्थ - एरवीसुद्धा घड्यागाडग्यांचे कोंभ जमिनीतून आपोआप वर येतात का? (नाही तर) त्या ठिकाणी कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेचेच आकार उमटले आहेत.
आपला प्रतिसाद फार आवडला.