आपले एक तरुण मनोगती ॐ यांस जॉर्जिया टेक्. (अटलांटा) विद्यापीठाची एम्. एस्. (मेक.) ही पदवी मिळाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनन्दन !ॐ हे कवि म्हणून मनोगतींना परिचित आहेतच. ॐ यांचे वैशिष्ट्य म्हणजे दहावीत ते कोठल्याही क्लासला न जाता मेरिटमध्ये आले.त्यानंतर कोठल्याही क्लासला न जाता त्यानी आय.आय.टी.पवई येथे प्रवेश मिळवला आणि तेथील बी.टेक्.पदवी प्राप्त करून त्याना लगेचच जॉर्जिया टेक्.विद्यापीठात यंत्र अभियांत्रिकि मध्ये पी.एच्.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. सध्या ते पुढील अभ्यासाच्या तयारीत आहेत. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपल्या आणखी एक मनोगती सौ.आशा कऱ्हाडे याचे ॐ हे चिरंजीव आहेत. ॐ च्या यशाबद्दल त्याचेही अभिनन्दन !