वृत्तपूर्ती थोडा प्रयत्न, मेहनत केल्यास सहज शक्य होईल आणि चांगली गझल होऊ शकते. कवीकडे कल्पना चांगल्या आहेत.
तिला मला हे अन्त्ययमक आहे. त्यामुळे मतल्याच्या दोन्ही ओळींत ते यायलाच हवे.
कळले जगास सारे कळले तिला मला
डोळ्यांत तीक्ष्ण काटे खुपले तिला मला
संवाद पाकळ्यांचे खुडले हळू कुणी?
मधुरात्र भंगली हे दिसले तिला मला
ही कल्पना फार छान आहे.
या कोरड्या जगाला कळली न वेदना
अश्रूंसमान त्याने टिपले तिला मला
ओळी स्पष्ट होत नाहीत. 'टिपले तिला मला' उत्तम आहे.
थोड्या निवांत घटिका भेटायला हव्या
का व्याप वाटताना गुणले तिला मला
स्पष्ट होत नाही.
हे बंध रेशमाचे सुटणार ना कधी
ना गाठ बांधली पण विणले तिला मला
वाव्वा, छान
चित्तरंजन