जीवन जिज्ञासा, तुम्ही नावाप्रमाणेच आमची जिज्ञासा जागवून उत्त्तम माहिती देत आहात. तुमचे आभार.

वरील लेखात केलेल्या काही अनुमानांबद्दल मला एक शंका आहे ती अशी-

"जी मुले सहाव्या वर्षापूर्वी दोन भाषा चांगल्या आत्मसात करतात ती जास्त चांगले शैक्षणिक यश मिळवतात असा आता अनुभव आहे"

असे जर असेल तर मग सीमाप्रांतातील मुले ही मध्यवर्ती प्रांतातील मुलांपेक्षा मेंदूने अधिक विकसित आणि म्हणूनच हुशार व यशस्वी असायला हवीत. उदा. हुबळी, बेळगाव, सोलापूर इ. भागातील मुले ६व्या वर्षांपूर्वीच मराठी व कन्नड शिकतात मग ती सरासरी महाराष्ट्रीय/कर्नाटकी मुलांपेक्षा नेहमीच हुशार असल्याचे आपल्याला का बरे आढळून येत नाही?

द्विभाषेचा निकष तर मग कोणत्याही २ वेगळ्या भाषा बोलणाऱ्या राज्यांच्या सीमेवर राहणाऱ्या मुलांसाठी लागू पडला पाहिजे.

तसेच, मराठी मातृभाषा असलेली इंग्रजी लोअर केजी मधील मुले मराठी बालवाडीतील मुलांपेक्षा प्रगल्भ हवीत. पण हे सर्वसाधारणपणे आढळून येत नाही.

असे का बरे?

-भाऊ