पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर 'प्यागो' (Piaggio) (!) नावाच्या रिक्षा असतात. ते रिक्षावाले बसथांब्याजवळ 'शिटां'ना पुकारताना असे पुकारत असतः
"चला आनंदनगर 'तींड्रुप्पये', माणिकबाग 'चार्ड्रुप्पये'..."
'पंक्चर' या शब्दाचे तर किती धिंडवडे निघाले आहेत - 'पंचर', 'पंपचर', 'पंक चर' वगैरे...
तसंच 'कोल्ड्रिंग' हेही जिवाला गार करतं.
---
मी दहावीत असताना एका शिकवणीला जायचो. त्यावेळी कुठलासा क्रिकेट सामना होता, म्हणून आम्ही मास्तरांना दुस~या दिवशी सुट्टी देण्याचा आग्रह करत होतो. मास्तरांनी काही सुट्टी दिली नाही.
मग आम्ही ठरवलं, की सुट्टी असो नसो, मॅच महत्त्वाची. म्हणून दांडी मारायचं ठरलं. हे मास्तरांच्या कानावर गेलं आणि त्यांनी दुस~या दिवशी जे येणार नाहीत त्यांच्या पालकांना बोलावण्याची धमकी दिली.
हे ऐकून माझ्या शेजारी बसलेला बिहारी मुलगा जरा दबला. हा पंटर बिहारी असला, तरी त्याला मराठी चांगलं येतं. फक्त उच्चार जरा विनोदी होते.
तो मला म्हणाला,
"ए एडी, तू उद्या एनाराय?"
मला काहीच अर्थबोध होईना - मी एन आर आय कधीपासून झालो?
मग त्याने तोच प्रश्न हिंदीतून विचारल्यावर मला लक्षात आलं - मी उद्या येणार आहे का? - असं तो विचारत होता!