आमच्या घरीही मुखवट्यांच्या गौरी (ज्येष्ठा आणि कनिष्ठा) असतात. त्या समोर गव्हाची नागमोडी रांगोळी, फळांची तबकं, मातीचे प्राणी (गाय, वासरू, वाघ, सिंह, हत्ती, हरीण इ.) ठेवले जातात. नथ घातलेल्या गौरी अतिशय रुपवान आणि ठसठशीत दिसतात.