१. ह्याला कविता का म्हणायचे? फक्त शब्द तोडून लिहिले आहेत म्हणून?
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणला : द्या इकडे. मी ती मूर्ती तत्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट वरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या मी पुन्हा तरुण, ययातीसारखा; माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला . . .
असे लिहिले तर वरीलपैकी किती लोक दाद देतील?
२. यात उपमा (ययातिची एकमेव वगळता), अलंकार, यमक, गेयता, असे काही आहे काय?
३. हा फक्त एक विचार आहे. पुरोगामी आहे असे म्हणूया हवे तर. पण उच्च कोटीची, प्रगल्भ व आशयगर्भ कविता?

अवांतर - मुलगाच मधला च भरीचा, दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या मधले अकल्पित विशेषण परंपरेऐवजी आनंदाला हवे

सहमत.

लिखाण बरे आहे पण परंपरेच्या शब्द अनावश्यक आहे. कसले ओझे ते लोकांना ठरवू द्या की.