इंग्लंडमधल्या एका वृत्तपत्राला दोन वेगवेगळ्या विषयांवरील मुख्य बातम्यांच्या शीर्षकांची मध्ये (-) टाकून सामायिक मथळा बातमी द्यायची संवय होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत इंग्लंडची राजकन्या बाळंत होऊन तिला मुलगा झाला. त्याच वेळेस हिटलर व मुसोलिनी यांच्यांत बेबनाव होऊन एका हल्ल्यांत घ्याव्या लागलेल्या माघारीचे खापर हिटलरने मुसोलिनीच्या डोक्यावर फोडले होते. वरील वृत्तपत्राने दोन्ही घटनांची सामायिक मथळा बातमी खालीलप्रमाणे दिली होती -
SON BORN TO PRINCESS - MUSSOLINI BLAMED.