उत्तरांबद्दल धन्यवाद !

मी असे पाहिले (बातम्यांत) होते की ग्रहांची व्याख्या बदलताना ग्रहांचे क्षेत्रफळही लक्षात घेतले गेले. आता नेमके आकडे आठवत नाहीत पण समजा पूर्वी १००० किमी इतका व्यास असलेला ग्रह असेल तर नवीन व्याख्येत ५०० किमी इतका व्यास असलेल्यालाही (अर्थातच व्याख्येतील इतर परिमाणात बसणारा असेल तरच)  'ग्रह' म्हणायचे असे ठरविण्याचे चालले होते. अचानक हे क्षेत्रफळ लक्षात घेण्याचे कारण काय ? केवळ आपल्या आवडत्या वस्तूंना ग्रह'पद' मिळवून देण्यासाठीचे राजकारण का ?

आता प्लुटोला खाली खेचल्यावर काय व्याख्या केली आहे ते माहीत नाही. त्यामुळे कदाचित हा प्रश्न निरर्थक ठरेल.