घरात येणाऱ्या नविन पिढीच्या व्यक्तिने समोरची ला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जर "मान" दिला, तर हे नातं सुसह्य होतं/व्हावं असं मला वाटतं.

आपली मतं बदलताना, आपल्याला जर का त्रास होत असेल, तर समोरची (जी आपल्याहून वयस्कर आहे) कडून तशी अपेक्षा विचार करून ठेवावी असं माझं मत आहे. 

आपल्या सासूच्या वागण्यावर आपल्या नवऱ्याच्या मतांचा पगडा किती आहे हे पाहून त्याची कुचंबणा करावी की नाही हे ठरावं/ठरवावं. त्याच्या पाशी तरी मोकळेपणी आपलं मत मांडता यावं असं मात्रं नक्की असावं.

आपण ही एक सून म्हणून सासूचं सांगणं/बोलणं/करणं 'बायस्ड' वाटून घेतो का, असं स्वपरिक्षण मधून-मधून केलं तर नक्कीच आपल्याला आपलं वेगळं प्रतिबिंब दिसेल. http://www.manogat.com/node/7279 मधे आई बद्दल सुंदर वर्णन आहे.

"आई" हा शब्द काढून तिथे "सासू" शब्द टाकून पहा, आणि मग ते परत वाचून पहा. शेवट च्या एक/दोन ओळी सोडल्या तर त्या सासूच्या बाबतीत पण खऱ्या वाटतील.  तर मग आपलं घोडं सासू ह्या नात्या जवळ का अडावं ?

-चिमण

(मला पण सासू आहे हं :)