प्रिय जिज्ञासू,
आपण म्हटलेलं अगदी बरोबर आहे.... मला 'गणेश' मूर्ती अतिशय आवडते; घरातल्या घरात सर्वांनी जमून पूजा करणंही आवडतं (घराबाहेर ऐकू जाणार नाही इतक्या आवाजात)... पण त्या मूर्तीच्या नावानं जो 'कंठशोष' चालतो, तो अजिबात आवडत/पटत नाही. मी 'कंठशोष' हा शब्द उपरोधानंच वापरला आहे... आपल्या लक्षात आल्याबद्दल धन्यवाद!

शांति-समाधान । द्यावे पुनः दान ।
आणिक साधन । नको काही ।।

यातली 'शांति-समाधान पुनः दान' मिळावं ही प्रार्थना यासाठीच. हे शब्दही असेच उपरोधिक आहेत. (शांतता समाधान देते ही गोष्टच आता इतिहासजमा झाली आहे!)

याचा अर्थ सगळंच वाईट म्हणायचंय असं अजिबात नाही! नुकत्याच संपलेल्या श्रावणाचं (निसर्गनिर्मित) सौंदर्य आणि लगेच अतिशय सुंदर अशा गणपतीच्या (मानवनिर्मित) मूर्तीचं आगमन हे किती आनंदाचे क्षण आहेत... म्हणून दुसरं आणि तिसरं कडवं.

- कुमार

ता. क. 
श्री. चोखंदळ यांनी म्हटल्याप्रमाणे कविता मिळमिळीत असल्यामुळे आणि विषयाला धरून नसल्यामुळे या शब्दांचा/कडव्यांचा अर्थ नीट लागत नसावा बुवा!