एक ट्रेक मधे एकलेले गाणे. (हे वाचण्यापेक्षा म्हणायला खुप मजा येते.)
माझी लाडकी. माझी लाडकी सुशीला.
एकट्याला मला सोडुन गेली की हो ती स्वर्गाला.
उंच होती, टंच होती, गोरी होती दिसायला
एकट्याला मला सोडुन गेली की हो ती स्वर्गाला.
एक होता सावकार, इस्टेट त्याची लाखावर.
त्याला होती एक मुलगी, तिच माझी सुशिला.
माझी लाडकी. माझी लाडकी सुशीला.
एकट्याला मला सोडुन गेली की हो ती स्वर्गाला.
रोज सायंकाळी, सहा वाजता, फर्ग्युसनवर फ़िरायला.
नाचत यायची, बागडत यायची, तिच माझी सुशिला.
माझी लाडकी. माझी लाडकी सुशीला.
एकट्याला मला सोडुन गेली की हो ती स्वर्गाला.
एके दिवशी, संध्याकाळी गेली होती पाण्याला
पाय घसरून पाण्यात पडली तिच माझी सुशिला.
लाडकी गेली, इस्टेट गेली, ब्रम्हचारी मी एकला....
माझी लाडकी. माझी लाडकी सुशीला.
एकट्याला मला सोडुन गेली की हो ती स्वर्गाला.
अजुन कडवी असल्यास सांगावीत. मलातरी एवढेच आठवतेय. कुणाला 'डिंगच्यांग डिंच्यांग वाजवले दादा वाजवले आणि उपाशी वऱ्हाड झोपवले' हे गाणे माहित आहे का?