छान लिहीलं आहे.

वाटायला लागले की जिन्यात, रस्त्यात, ऑफिसात अनेक अनोळखी लोकांना मी, हाय-हॅलो करतो. दहादा धन्यवाद, थँक्यू करतो. आणि दगडी आमच्यासाठी मर-मर मेली तिचे कधीच मी आभार मानू शकलो नाही. तिच्यासाठी कधीच काही करू शकलो नाही. या जाणीवेने मला दुःख म्हणजे काय असते हे कळले.  तिथे थांबणे माझे मलाच जड जाऊ लागले आणि शहराच्या गर्दीत तोंड लपवायला मी संध्याकाळची एस.टी. पकडली.

मनाच्या तळातील अत्यंत प्रामाणिक विचार मांडले आहेत. अभिनंदन.