लेख वाचायला थोडा उशीरच झाला पण त्यामुळे सर्व लेख सलग वाचता आले.
जी मुले सहाव्या वर्षापूर्वी दोन भाषा चांगल्या आत्मसात करतात ती जास्त चांगले शैक्षणिक यश मिळवतात असा आता अनुभव आहे
वर भाऊ जो प्रश्न विचारत आहेत तोच मला पडला आहे. माझी मुलगी तीन भाषा बोलते. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच ती जो ज्या भाषेतून बोलतो त्याच्याशी त्या भाषेतून संवाद साधते. अभ्यासात बऱ्यापैकी हुशारही आहे पण "जगावेगळी" नाही. तीन भाषा येतात यांच कौतुक होतं एवढंच. मग नक्की कुठली आणि कशाप्रकारची प्रगल्भता अपेक्षित आहे?
-प्रियाली