२७ फ़ेब्रुआरी १९३१ म्हणजे बरोबर ७४ वर्षांपूर्वी अलाहाबादच्या आल्फ़्रेड पार्क मध्ये आझादांनी वीर मरण पत्करले.
अलाहाबादला गेलो असता त्यांच्या समाधीला आवर्जून भेट दिली. आझादांनी हौतात्म्याला जिथे मिठी मारली तो पार्कचा कोपरा दुर्लक्षितच. समाधीवर छत्री आणि बाजूला प्रसंगाबद्दल जुजबी माहिती देणारी सरकारी पाटी. अलाहाबाद विद्यापीठाची वसतिगृहे इथून जवळच आहेत.
आझादांना अभिवादन.