माझ्या मनोगती सख्या

माझ्या मनोगती सख्या । जैशा मजला आकळल्या ।
तैशा यास्थळी लिहिल्या । मी मनापासुनी -१-

मृदुलेची समतोल लेखणी । परिपक्व विचारसरणी ।
तिची मुद्देसूद मांडणी । अभ्यासोनी करीतसे -२-

वरदा जाणी विज्ञान । करी तेविषयी लेखन ।
देई आनंद आणि ज्ञान । सकळांसी निजलेखने -३-

वेदश्रीचे अनुभवकथन । अनुचे खुसखुशीत लेखन ।
आवडीने वाचती सर्वजण । मनोगतावरती -४-

आशा, राधिका 'सुसंस्कृत' । त्यांचे जवळी सुभाषित ।
मनोगतींना करिती आनंदित । सुभाषितांचे द्वारे -५-

सोनाली आणि प्राजक्ता । दोघी लिहिती कविता ।
सजविती बहु मनोगता । नित्यनेमाने -६-

लालू, छाया, ह्यांची तर । क्वचित मनोगती चक्कर ।
लिहून जाती शब्द चार । वाचावेसे वाटती -७-

पोक्तपुरवत्या मनोरमाबाई । जैशी घरामाजी थोरली ताई।
सर्वत्र बारीक लक्ष राही । त्यांचे मनोगतावरी -८-

गीता आणि श्रावणी । आणि बाकी सर्वजणी ।
नामोल्लेख नाही म्हणुनी । मनी राग धरो नये -९-

केले मी हे लेखन । गद्य वा पद्य मज नच जाण ।
आपण वाचक सुजाण । मूल्यमापन करावे  -१०-

---------------------------------------