विनोबांनी गिताईत याचे छान भाषांतर केले आहेः (आठवणीतून लिहीत आहे, चु.भू,द्या̱̱̱घ्या.)

उणाही आपुला धर्म, परधर्माहुनी भला।

स्वधर्मात भला मृत्यू, परधर्म भयंकर ॥

मी काही तज्ञ नाही पण "धर्म" या शब्दाचा अर्थ स्वतःचे काम, जबाबदारी, स्वभाव या अर्थी आहे. ते आपण स्वतःला ओळखून न वागता दुसऱ्याचे कितिही अधिक आकर्षित वाटले म्हणून त्याची नक्कल करायला गेलो तर आपला आत्मघात होतो.

वरील अर्थ लक्षात घेऊन विचार केला तर आजूबाजूला आणि कधीकधी स्वतःच्या बाबतीतपण असे झाल्याचे आढळून येईल.

(म्हणजे उदाहरणार्थ आता काही जण म्हणतील की समाजासाठी काही करणे, हा आमचा काही धर्म नाही.. आम्ही फक्त स्वतःसाठीच जगू शकतो! ह̱. घ्या.!)

विनोद बाजूला राहुदेत, पण खरं म्हणजे गीता/गीताई हि अगदी कुठेही रूढार्थाने धर्माचे अवडंबर न माजवता नुसती माहीती म्हणून वाचली तर लक्षात येईल की ती किती व्यावहारीक आहे.

दुर्दैवाने आपल्याकडच्या मधल्या काही शतकात आणि गेल्या काही पिढ्यांच्या बाबतित त्याचा अनर्थ झाला.  तर पुलंनी त्याची म्हणजे त्या वृत्तीची "तुझं आहे तुज पाशी" मधे थट्टा केली (काकजी आत्मा अमर आहे) आणि निदान मधल्याकाळातील मध्यमवर्गिय मराठी माणसाने त्याचा गैरसमज करून गीतेच्या कडेच कुत्सित पणे पाहाण्यात दुसरे टोक गाठले...एकी कडे गीतेतील वाक्यांचा अंधानुनय तर दुसरीकडे पुलंचा अंधानुनय...

मधल्या काळात डॉ. आनंद नाडकर्णींचे एक चांगले पुस्तक वाचायला मिळाले ज्यात हि व्यावहारिकता दाखवायचा प्रयत्न केलाय - त्याचे नावः "विषादयोग".