कविता खूपच सुरेख आहे. वाचून आनंद झाला आणि मुख्य म्हणजे

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

या ओळींचा संदर्भ कळला. एरवी नुसत्याच या ओळी म्हटल्या जातात पण त्यांचा आगापिछा कळत नाही..
जाता जाता-> ही चिमणी कोकणातली असेल म्हणून माझा घरटा कुठे गेला असे म्हणत असेल(आधार ः  माझा 'डोस्का' सरकावूक नाय हा... हे प्रसिद्ध वाक्य. बहुधा हे मालवणी असावे. तज्ञांनी कृपया अधिक खुलासा करावा.) त्यातून चिमणीला छापील भाषेपेक्षा बोलीभाषा अधिक जवळची असणार . नाही का!
(यावरून अजून दोन निष्कर्ष निघतात
१) तात्याची देवगड भेट अनेक दिवस लांबणीवर पडली असल्यामुळे पुढचं पाठ आणि मागचं सपाट या न्यायाने तो कोकणी भाषा विसरला आहे. काळजी घे हो तात्या ... फुरशाचं विष कमी होतं अशाने... नाहीतर एक वारी करूनच ये !
२)तात्याने आता शुद्धचिकित्सक वापरायला सुरुवात केली आहे!

अर्थातच हघ्याहेसांनल हे अधोरेखित करायला हवं. नाहीतर यापुढे मुंबईत आलं की तोंड लपवून फिरायची पाळी यायची ;P :D)

ही कविता इथे टंकलिखित केल्याबद्दल सुखदाचे आभार.
आपली (पुस्तकी भाषायुक्त)
अदिती