गीतेत जो धर्म सांगीतला आहे त्याचा आणि आपल्याकडे नंतरच्या काळात ज्या पध्दतीने चातुर्वण्य आणि एकंदरीतच कर्मकांड तयार झाले त्याचा काही अर्थाअर्थी काही संबंध नाही...

गीतेचे मुळ हे १३ श्लोकांचे ईशोपनिषद आहे. म्हणूनच त्यातले देवतांचे संदर्भही जरा वेगळे वाटतील. ती लिहीताना धर्मग्रंथ वगैरे म्हणून लिहीली नाही तर "अर्जून म्हणे ऐसी लढाई, आपुल्या बाच्याने होणे नाही" असे म्हणून किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जूनाला लढाईसाठी प्रवृत्त करायला सांगितली होती.

अर्जुनाचा धर्म जसा क्षत्रियाशी संबधित होता तसाच तो द्रौपदीचा पती म्हणूनही होता. तिचा अपमान केलेल्या कौरवांशी अंतिम लढा देणे हे म्हणून त्याचे कर्तव्य होते. ते विसरून उगाच काहीतरी तो बरळायला लागला आणि त्याला आदर्श म्हणू लागला तेंव्हा सांगितलेला हा धर्म आहे..

गीतेच्या काळातील आणि नंतरच्या नजिकच्या काळात चातुर्वणाच्या कल्पना जातीविषयक नव्हत्या. व्यास स्वतः मत्स्यगंधेचे म्हणजे कोळीणीचे पुत्र होते. आपण जे महाभारत वाचतो ते सांगण्यासाठी रृषींनी ज्या मुनींची पुजाकरून विनंती केली ते, स्वतः सूतपुत्र म्हणून सौती या नावाने ओळखले जात. असे अनेक काही सांगता येईल.. पण तुर्तास थांबतो.