श्री. मोरू यानी आपला धर्म म्हणजे गुण असा अर्थ लावला आहे असे दिसते. श्रीकृष्णांचा गीता सांगण्याचा उद्देश अर्जुन स्वतःचा क्षत्रियधर्म विसरला होता त्याची त्याला पुन्हा आठवण करून देणे हा होता. आणि तो त्याने कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये हे त्याच्या मनावर बिंबवण्याचा त्याचा प्रयत्न म्हणजे गीता.या श्लोकानुसार कोणीही आपले वाईट गुण सोडू नयेत किंवा दुसऱ्याचे चांगले गुण घेऊ नयेत असा दूरान्वयानेही अर्थ निघत नाही त्यामुळे ही शंका आणि चर्चेचा प्रस्ताव चुकीच्या गृहितावर आधारित आहे असे वाटते.