काही वर्षांपुर्वी शंकरराव खरात हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. ते आणि त्यावेळ्च्या (मला वाटतयं) शिक्षणमंत्री पार्वती परिहार हे एका व्यासपिठावर होते.  मंत्रीमहोदया बोलायला उठल्या आणि संमेलनाध्यक्षांचे अभिनंदन करायला लागल्या, पण काही केल्या नावच आठवेना की हे कोण?!  मग कोणीतरी मागून सांगीतले...

दुसऱ्या दिवशी एका हुशार पत्रकाराने वरील प्रसंगाला खालील मथळा दिलाः

"पार्वतीबाई शंकररावांना विसरल्या" !