श्रीकृष्णांचा गीता सांगण्याचा उद्देश अर्जुन स्वतःचा क्षत्रियधर्म विसरला होता त्याची त्याला पुन्हा आठवण करून देणे हा होता. आणि तो त्याने कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये हे त्याच्या मनावर बिंबवण्याचा त्याचा प्रयत्न म्हणजे गीता.
सहमत.
इथे धर्म म्हणजे काम आणि/किंवा कर्तव्य आहे असे वाटते. जसे चोरी करणे हे चोराचे हाती घेतलेले काम आहे आणि त्याला पकडणे हा शिपायाचा धर्म आहे. प्रार्थना-पूजा-देव यांच्याशी संबंधित अशा अर्थाने इथे 'धर्म' हा शब्द वापरला आहे असे वाटत नाही.