गीता कुणाला आवडते अथवा नाही, त्याचा अर्थ कसा लावायचा, ती जगायची का म्हातारपणासाठी ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मजा एव्हढीच वाटते की आपण (त्यात मी ही आलोच!) काही वाचन नसताना सहज मतं मांडत बसलोय!
पण या गीतेतील एक शेवटच्या अध्यायातला श्लोक बरंच काही सांगतो - अर्जुनाला युध्दासाठी प्रवृत्त करताना श्रीकृष्ण सर्व अंगाने तत्वज्ञान सांगतो - भक्तीयोग, राजयोग, कर्मयोग, संन्यासयोग इत्यादी. शिवाय हेही सत्त्व, रज, तम यावरील स्वभावधर्म, तपे इत्यादी सांगतो. विराटरूप दाखवून बघतो.
एव्ह्ढे झाल्यावर तो अर्जुनाला म्हणतोः
असे गुढाहूनी गुढ ज्ञान मी तुज बोलीलो ।
ध्यानात घेवूनी सारे स्वेछेने योग्य ते करी ॥
थोड्क्यात, सांगणं माझं काम होतं ते मी केले, आता ऐकायचा का नाही हे तुझं, ते तू जे काही योग्य वाटेल ते कर...
इतके स्वातंत्र्य असलेले तत्त्वज्ञान आपण नुसते विसरोलोच नाही तर त्याचे चुकीचे अर्थ, ते ही अभ्यास न करता लावण्यात, बुद्धीवादीपणा समजायला लागलो.