फक्त पैसा जास्त मिळतो म्हणून कुणा डॉक्टरला जर वकील व्हावेसे वाटले तर खुशाल व्हावे (दोघेही वैश्यच), पण डॉक्टर पैसे घेत असला तरी त्याचा त्या क्षेत्रात एक सेवाभाव असतो, आपण देत असलेल्या उपचारामुळे पेशंट बरा व्हावा ही भावना असते. वकीलाला यशस्वी वकील होण्यापुरताच लढत असलेल्या केसमध्ये रस असतो. त्या profession ला डावपेचाची आवश्यकतता असते, आणि त्यास अनुकूल असा आपला (स्व)भाव असणे हे त्या क्षेत्रात यश संपादन करायचे असल्यास आवश्यक आहेच ना ?
अजिबात पटले नाही. डॉक्टर तेव्हढा सेवाभाव असणारा आणि वकील नाही ?? उलट आजकाल बरेचसे डॉक्टर रोग्याला वारंवार आपली गरज पडावी अशी तरतूद करून ठेवताना दिसतात. रोग्याच्या नकळत मुत्राशय काढून घेणे, चुकीची औषधे देणे, अत्यवस्थ रुग्णालाही आगाऊ पैसे भरल्याशिवाय उपचार नाकारणे, अपघातात जखमी झालेल्यांना पोलिसी फंद्यात पडायला नको म्हणून उपचार नाकारणे यात कोणता सेवाभाव दिसून येतो ? डॉक्टरही बऱ्याचदा 'आपल्या हातून' ऑपरेशन 'यशस्वी' व्हावे यासाठी प्रयत्नशील दिसतात. यात त्यांचा हेतू यशस्वी होणे असून रुग्ण बरा व्हावा हा हेतू नसतो किंवा दुय्यम असतो.
उलट काही वकील निर्दोष लोकांची सुटका करतात यात तुम्हाला सेवाभाव दिसून येत नाही ? अशांची सुटका करण्यासाठी वापरले गेलेले डावपेच काय चुकीचे आहेत ?
जसे काही वकील खोटे आहेत तसेच डॉक्टर, शिक्षक इ. सर्व पेशांतील लोक खोटे आहेत.