विरभिकाका -
आपल्या विवेचनाच्या ओघात डॉक्टर आणि वकील यांच्या पेश्याचे केलेले सामान्यीकरण अयोग्य आहे. कदाचित तसे आपल्याला म्हणायचे नसेलही... पण जो भावार्थ मला दिसला त्याचे खंडन करतो आहे.
पण डॉक्टर पैसे घेत असला तरी त्याचा त्या क्षेत्रात एक सेवाभाव असतो, आपण देत असलेल्या उपचारामुळे पेशंट बरा व्हावा ही भावना असते.
- सेवाभाव नसलेले डॉक्टर चौकाचौकात आहेत.
- पेशंट बरा व्हावा असा उदात्त हेतू असतोच किंवा असलाच तरी उदात्तपणेच असतो असे दुर्दैवाने छातीठोकपणे म्हणता येणार नाही.
- तसेच उत्तम सेवा देण्यासाठी -- डॉक्टर काय किंवा अन्य कोणी काय -- सेवाभावाची पार्श्वभूमी असायलाच पाहिजे असेही नाही.
वकिलाला यशस्वी वकील होण्यापुरताच लढत असलेल्या केसमध्ये रस असतो. त्या profession ला डावपेचाची आवश्यकतता असते,
- फक्त यशस्वी होण्यापुरताच वकिलाला त्या केसमध्ये रस असतो असे सरळसोट म्हणणे हे ढळढळीत चुकीचे आहे.
उदा. १ - टू किल अ मॉकिंग बर्ड...; उदा. २ - माझ्या माहितीतील एक वकील भरपूर पैसे देणारी दिवाणी प्रॅक्टिस सोडून कामगारक्षेत्रातीलच लढे लढवितात; उदा. ३ - आणखी एक खात्रीलायकपणे हेतू माहीत असलेले वकील आपण समाजाचे ऋण फेडावे या आणि याच हेतूने महिलांचे/बालगुन्हेगारांचे खटले चालवितात.
यातील कोणीही प्रसिद्धीसाठी हे करीत नाही याची ग्वाही देता येईल.
- त्याच केसमध्ये रस असणे आणि प्राणपणाने ते करणे हा फक्त वकीली पेश्याचा गुणविशेष म्हणता येणार नाही.
एकूणच उडदामाजी काळे-गोरे.
केवळ "स्वधर्मो निधनो श्रेयः परधर्मो भयावहः" हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर/वकील यांची काहीशी याप्रकारे तुलना आपण केलेली असू शकते. त्यामुळे माझा आक्षेप विषयांतर या सदराखाली दिलेला आहे. अनावधानाने सामान्यीकरण टळावे हा हेतू.