खरे आहे इथे उगीचच विपर्यास केला जात आहे.

अर्जुन एकदा युद्धाला उतरल्यावर युद्ध न करणे हे त्याच्या धर्माच्या विरुद्ध होते.

जसे वैद्य म्हणतात की वकील चांगले पैसे मिळवतात म्हणून डॉक्टरांनी वकिली करायला काय हरकत आहे ? इथे हरकत कोणाचीच नाही. पण जर हेच डॉक्टरसाहेब रोग्याला ऑपरेशन थेटर मधे तसेच टाकून केवळ पैशांच्या मोहापायी कोर्टात केस लढायला गेले तर तो परधर्म आणि भयावह  तर आहेच तसेच 'स'काम कर्म ही आहे. डॉक्टरसाहेबांनी रोग्यांवर उपचार करत नसताना आणि त्यांनी जर वकिलीचा अभ्यास केला असेल तर तसे केल्याने धर्म मोडत नाही.

जर एखाद्या वकिलाच्या हाताला यश येत नसेल आणि डॉक्टरकीत चांगले पैसे मिळताना दिसत असताना, कोर्टात केस उभी असताना त्याने वकिली सोडून अर्थात अशिलाला वाऱ्यावर सोडून डॉक्टरकी करणे चूक आहे. थोडक्यात फळाची (यशाची) अपेक्षा न करता त्याने अशिलाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणे किंवा हाच त्याचा धर्म आहे.

जसे वाल्याचा स्वधर्म दरोडे घालणे होता. पण वाल्मीकी झाल्यावर, दरोडे घालणे हा परधर्म होता.

सध्याचे उदाहरण द्यायचे झाले तर क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेटचा सराव अर्धवट टाकून किंवा सरावाला दुय्यम स्थान देऊन जाहिरातीत काम करणे हे कसे भयावह आहे ते आपल्या सगळ्यांना चांगलेच पहायला मिळते.

मला वाटते वरील श्लोक आणि निष्काम कर्म हे दोन्हीही एकमेकांवरच बेतलेले आहे. या दोन्ही श्लोकात बदल नको असे कुठेही म्हटलेले नाही. आणखी २-३ नव्हे तर हजार वर्षांनीही गीतेतील हेच श्लोक आपल्याला अनुभवायला मिळतील.