असहमत. आमच्यासारख्या विषयांतरतज्ञांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा प्रस्ताव आहे, सबब आम्ही त्याचा निषेध करतो. (ह. घ्या.)

एक शंका. अनेकदा प्रस्ताव वा मुद्देच असे असतात की ज्याला हो किंवा नाही एवढे उत्तर पुरेसे नसते. एखादा मनोगती एका मर्यादित व्याप्तीमध्ये सहमत असेल किंवा नसेल तर सर्वसाधारण हो किंवा नाही याला काही अर्थ रहात नाही.

एक गंमतीशीर उदाहरण देतो, ह. घ्या. समजा मी तुम्हाला तुमच्या पत्नीसमोर तुम्हाला प्रश्न विचारला की 'काय हो, तुमचे त्या xxx बरोबरचे लफडे चालू आहे का अजून?'. द्या आता 'हो' किंवा 'नाही' उत्तर. काहीही उत्तर द्या, तुमची धुलाई नक्की. (ह. घ्या हो).

मनोगतावर विचाराच्या विविध अंगाने विचार करणारे लोक आहेत आणि मला वाटते म्हणूनच चर्चेत अर्थ आहे. पुन्हा आपण इथे कुठल्या प्रसारवाहिनी सारखे निर्णय द्यायला बसलेलो नाही, विचाराचे आदानप्रदान हाच मूळ हेतू नाही का? नुसते हो/नाही ठरवायला SMS सर्व्हे आहेतच की, त्यासाठी मनोगत कशाला हवे. मुळात हो किंवा नाही एवढेच उत्तर शक्य होईल अशा तऱ्हेने मुद्दा मांडणे खूप अवघड आहे त्यामुळे हा प्रकार फारसा यशस्वी होणे कठीण आहे.

-विचक्षण