- जिलब्या मारुती (तुळशीबागेजवळ) (आसपास अनेक हलवायांची दुकाने होती पूर्वी)
- खुन्या मुरलीधर (भरत नाट्य मंदिराजवळ)(इंग्रजांना फितूर झालेल्या द्रविड बंधूंचे निवासस्थान, येथे धाकट्या दोघा चाफेकर बंधूंनी द्रविड बंधूंची हत्या केली म्हणून)
- विसावा मारुती (अलका टॉकीजजवळ) (स्मशानाच्या वाटेवर आहे. येथे प्रथम तिरडी टेकवून, थोडा विसावा घेऊन मग पुढे जायचे असा संकेत होता, म्हणून विसावा मारुती)
- पासोड्या विठोबा (फरासखाना पोलिसचौकीजवळ) (पूर्वी वस्त्रप्रावरणांची अनेक दुकाने आसपास असत त्यात 'पासोडी' खास असे. याबद्दल थोडा साशंक आहे)
- गुंडाचा गणपती (स्थान आता आठवत नाही) (हे 'गुंड' आडनावाच्या घराण्याचे खासगी मंदिर आहे)
- उपाशी विठोबा (व्युत्पत्ती माहीत नाही)
आणखी काही आठवली तर नंतर लिहितो.
-विचक्षण