आम्ही ट्रेक मधे देहाची तिजोरी हे गाणे बार बार देखो च्या चालीत म्हणायचो. त्यात एक कडवे वाढवले होते जे फ़ार मजेशीर होते.
देहाची तिजोरी (चालः बार बार देखो, हजार बार देखो)
देहाची तिजोरी, भक्तिचाच ठेवा (२ वेळा)
उघड दार देवा आता उघड दार, दार उघssssड, दार उघsssssड, दार उघsssssड
पी ते दुध, डोळे मिटुन जात मांजराची, मनी चोरट्याच्या का रे, भीती चांदण्याची (२ वेळा)
सरावलेल्या हातांनाही कंप का सुटावा, दार उघsssssड, दार उघsssssड, दार उघsssssड
देहाचीच विट्टी, भक्तिचाच दांडू (२ वेळा)
उघड दार पांडू आता खेळू विट्टिदांडू, दार उघssssssड, दार उघssssssड, दार उघsssssड
देहाची तिजोरी, भक्तिचाच ठेवा (२ वेळा)
उघड दार देवा आता उघड दार, दार उघssssssड, दार उघssssssड, दार उघsssssड