मला तात्याजी ब्राह्मणी आत्मप्रौढी वगैरे म्हणतात ती नाहीच, पण जो पर्यंत मी इंद्रियजय करून खर्या अर्थाने आत्मरत होत नाही तो पर्यंत मी स्वतःला ब्राह्मण ही समजत नाही. मी आहे वैश्यच.
आता वर्णाश्रमाप्रमाणे शूद्र ची व्याख्या करतांना मी कुठलेही पुस्तक वगैरे समोर ठेवले नव्हते. ' सांगकाम्या ' हा शब्द मला सुचला नाही ही चूक झाली हे खरे. पण शूद्र म्हणजे निर्बुद्ध असे मी म्हटलेही नाही आणि मला मुळीच म्हणायचेही नाही. तरी पण specialisation साठी जो बुद्धीला ताण द्यावा लागतो तो आवश्यक नसलेली काही कामे असतातच ती करणारे वा सेवा पुरविणारे काही sectors आहेत अशा लोकांचा वर्ग तो शूद्र. पण हा वर्ग म्हणजे कनिष्ठ आहे असे म्हणायचा माझा उद्देश आहे असे जर आपल्याला वाटत असेल तर तो पूर्वग्रह झाला. मी तसे म्हटलेले नाही. समाजाला त्या वर्गाची सुद्धा आवश्यकता आहेच. ह्या वर्गाची व्याख्या मला नीट करणे जमले नाही असे समजावे. मी कुणाच्या बुद्धीचे मापन करतोय असे तात्यांना वाटत असेल तर तो माझ्या लिखाणातला दोष. असा विचार माझ्या मनातही नाही. मी सुद्धा एकेकाळी सुतार काम केलेले आहे, शिवणकाम केले आहे. अमके काम कनिष्ठ असे मिथ्याभिमानी पण स्वतःला उच्चभ्रू समजणारे लोकच म्हणतात (आता कृपया आपण तसे करता असा मी आरोप करतोय असे समजू नये). मी तसे समजत नव्हतो आणि आताही समजत नाही. मी प्रत्येक कामाकडे आदरानेच बघतो. (आता शब्दात पकडून मला व्यभिचारही आदरणीय आहे का ? असे कुणाला म्हणायचे असेल तर मला त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावयाचे नाही). पण अशा वर्गाला कृष्णाने शूद्र हे नाव का द्यावे. (चातुर्वर्ण्यं मया सृष्टम् गुणकर्म विभागशः - गी. 4.13) वा त्याला काय नाव असावे ? आणि अशा वर्गाला शूद्र म्हटले म्हणून बिघडले कोठे. शूद्र ह्या शब्दाचा सध्या समाजाने जो अर्थ रूढ केलाय (हीन?) तो कितपत योग्य आहे हे तपासयला पाहिजे. शूद्र म्हणजे कनिष्ठ वा हीन असे शास्त्रात कोठेच मला तरी सापडले नाही. त्या शब्दाला असा अर्थ लावणारे निंदनीयच आणि असे शूद्र आपल्याला तसा अर्थ लावून समाज माझी पिळवणूक करतो असे समजणारेही निंदनीयच. मग समाज ज्या कोणाला कनिष्ठ समजतो त्यासाठी एक वेगळा शब्द का coin करीत नाही. पण मग संधीसाधूंना काय साधायचे आहे, त्यासाठी शूद्र हा शब्द वापरून 'धर्म' (हिंदु का वैदिक ? कारण हिंदु ह्या शब्दाचा शास्त्रात कुठेही उल्लेख नाही) ह्याला धारेवर धरता येणार नाही ना ?
भिक्षुकाला मी बुद्धिमान म्हणतो असे म्हणणे म्हणजे putting words in my mouth असे झाले. आणि भिक्षुक म्हणजे 'दक्षिणा उकळणारा निर्बुद्धच' अशी भावना असल्यास त्याला पूजेसाठी न बोलावलेलेच बरे नाही का? आणि भिक्षुक हा शब्द मी कोणत्या context नी वापरलाय त्यावर काही म्हणायचे नाही का? तसेच डॉक्टर व वकील हे प्रामाणिकपणे आपापले काम करतात असे गृहीत धरूनच मी चालतो. मला डॉक्टर म्हटला म्हणजे तो (चौकातला) किडनी चोरच असे मला दिसत नाही. वकील म्हटला की अशिलाला लुबाडणाराच असे माझ्या मनात येत नाही. पण दोन्ही व्यवसायांसाठी मनाचा एक वेगळा कल असावा लागतो, त्यासंबंधी एक वेगळी रुची असावी लागते आणि अशी रुची मनुष्य स्वभावानुसार असते हेच मला म्हणायचे होते. आणि स्वभावात जर वेगळेपण नाही वा वेगळेपणा लागत नाही असे असते तर कितीतरी डॉक्टर वकील होऊ शकले असते, पण तसे निदान मला तरी आढळले नाही. डॉक्टर, वकील ह्यांचा मी उल्लेख केला तो श्री मिलिन्द यांनी म्हटले होते की " अमेरिकेत वकील डॉक्टरांपेक्षा जास्त कमावतात " त्यामुळे. दोन्ही व्यवसाय माझ्यासाठी मानाचे आणि वंदनीय आहेत. ह्याव्यतिरिक्त कोणी अर्थ काढला असेल तर तोही पूर्वग्रहच म्हणजे biased एवढेच मी म्हणू शकतो.
वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही. तो वर्ग (व्याख्येनुसार - रूढ अर्थानुसार नव्हे) आता लोप पावलेला आहे. आसारामबापू, मुरारीबापू, रमेशभाई ओझा, सुधांशु महाराज इ. इ. हे आता असणारे खरे ब्राह्मण. (बाकी सर्व वैश्य वा शूद्र असे माझे मत - सैनिक सोडून, कारण ते क्षत्रिय. आणि माझे मत बरोबर असा माझा मुळीच आग्रह नाही, वाचकाच्या दृष्टीने ते चूक असेल). ते खर्या अर्थाने ज्ञानदान करतात. अशांना २५-३० वर्षे तप करून झाल्यावर आता त्यांना उपजिवीकेचा प्रश्न राहिलेला नाही, पण त्यांची आधीची वर्षे त्यांना पोसणारे कोणीतरी होतेच ना ? आक्षेप घेतांना मला नेमके काय म्हणायचे आहे, माझी भूमिका काय आहे हे कृपया जाणून घेतले तर बरे झाले असते असे मला वाटते. चर्चेच्या विषयानुरूप आहे की नाही आणि त्यानुसार योग्य / अयोग्य ह्यावर आक्षेप घेतलेले दिसत नाहीत. मग शब्दात पकडून त्यावरच चर्चा व्हावी का ? अजूनही माझी भूमिका मी स्पष्ट करू शकलो की नाही मला टाऊक नाही. पण भूमिकेकडे न पाहता शब्दातच पकडायचे असल्यास प्रतिसाद द्यायचा मोह आवरणे हेच बरे.
आता चर्चेच्या विषयाला धरून हे नाही - पण माझ्या माहिती साठी विनंती - शूद्राची व्याख्या कशी करायची , आणि गवंडी (म्हणजे मिस्त्री नव्हे - मिस्त्री, सुतार, मेकॉनिक हे विशेष कला आवश्यक असणारे उद्योग आहेत, त्यासाठी काही वर्षेही घालवायवी लागतात ह्याची मला जाण आहे) वा पाट्या टाकणारे ह्यांना काय म्हणायचे ते सांगायची कोणी तसदी घेईल का ? का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?