विषयांतर होत आहे ह्याची मला जाण आहे, पण मी जे म्हटले नाही ते थोपवले जाते आहे असे वाटल्यावरून हा उपद्व्याप. - मला मुळात अवैध काम करणारे डॉक्टर वा वकील (वा इतर कोणीही) ह्यांचा विचारही करायचा नाही. रुग्णाला बरे करणे ही प्रोफेशन आहे तशीच सेवाही आहे आणि अशी सेवा कित्येकदा पैसे न घेताही केली जाते. कितीतरी डॉक्टर डोळे, मधुमेह वगैरे कितीतरी रोगांवर बिना पैशाचे कँप घेताना आढळतात. मोठ्या शहरांतून हे आपल्याला पाहायला मिळत नसेल, पण लहान गावांमधून हे बरेच वेळा घडते. मी स्वतः असे ५० च्या वर कँप घडवून आणलेले आहेत. आणि क्वचितच एखाद्या डॉक्टरने " माझा रविवार बुडाला " अशी कंप्लेंट केली. माझा कधी अवैध काम करणाऱ्या डॉक्टरशी संबंध आला नाही हेही खरेच. असे डॉक्टर नसतात असेही मला म्हणायचे नाही आणि अशा लोकांबद्दल मला चर्चाही करायची नाही. पण अशा प्रकारची सेवा वृत्ति वकीलात मला कधी आढळली नाही. गरीब कुटुंबियांचे प्रश्न, पिडीत स्त्रीयांचे प्रश्न यांबाबत समाजसेवा करणारे वकील ही आहेत. पण ती समाज सेवेतली रुची म्हणून. वकीलाने अशिलाला निर्दोष साबीत करणे हे तर त्याचे (त्यात आणि फी घेतल्यावर) कर्तव्यच आहे. तिथे तो सेवा म्हणून कधी काम करत असेल हे माझ्या पाहण्यात तरी नाही आले नाही. अशी केस विरळाच असते, सऱरास नसते. पण माझा मुख्य मुद्दा होता तो डॉक्टर टू वकील असा कोणी प्रोफेशन बदलत असेल तर तो तिथे यशस्वी होऊन पैसे  कमावणे ह्याच्या संबंधात. असा बदल सहसा स्वभावाला अनुसरून होत नाही हे दाखवण्याकरिता.