प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

१. बटुग्रहाची नेमकी व्याख्या काय?
--- सूर्याभोवती फिरणाऱ्या, द्रवस्थैतिक संतुलन प्राप्त केलेल्या व आकारमान बुधापेक्षा कमी आहे असलेल्या अवकाशस्थ वस्तूस बटुग्रह असे म्हणावे.

२. जोडग्रह आणि उपग्रहातील नेमका फरक कोणता?
--- जर गुरुत्वमध्याच्या संकल्पनेवर बेतलेली उपग्रहाची व्याख्या (ग्रहदशा ह्या लेखात वाचा) मान्यता पावली असती तर जोडग्रह आणि उपग्रह असे दोन प्रकार अस्तित्वात आले असते. मात्र ही व्याख्या मान्यता न पावल्याने जोडग्रह ही संकल्पना बाद ठरली आहे. मात्र ती व्याख्या मान्य झाली असती तर फरक असा असता -
ग्रह आणि तिच्याभोवती फिरणारी द्रवस्थैतिक संतुलन प्राप्त झालेली अवकाशस्थ वस्तू मिळून तयार होणाऱ्या संयुक्त संस्थेचा गुरुत्वमध्य (गुरुत्वमध्य म्हणजे काय हे ग्रहदशा लेखात वाचावे) हा त्या ग्रहाच्या आत असेल तर ती वस्तू त्या ग्रहाचा उपग्रह आहे असे मानावे. मात्र, गुरुत्वमध्य त्या ग्रहात नसून त्या ग्रहाबाहेर अवकाशात असेल तर त्या वस्तूला त्या ग्रहाचा जोडग्रह मानावे.