चातुर्वर्ण हे प्रत्यक्ष गुणकर्मावर आधारीत होते हे चलाखीचे विधान आहे असे मला वाटते. मुळात असलेल्या विषमतेच्या तत्वज्ञानाचे समर्थन करण्याची एक पद्धत आहे इतकेच. विश्वामित्र, वाल्मिकी यांची उदाहरणे ही अपवाद म्हणून येतात हे लक्षात ध्यायला हवे. असे वर्णबदल जर सार्वत्रिक असते तर मग एवढे तपशीलवार नियम -मुख्यतः नकारात्मक- करण्याची काही आवश्यकता नव्हतीच.
कृपया मागचा पुढचा संदर्थ घेतला तर जास्त बरे होईल. वाल्मिकी , विश्वामित्र ह्यांची नावे मी ज्या संदर्भात घेतली ती लक्षात घेणे जरूर नाही का ? मी म्हटले होते वर्ण बदलण्याची मुभा होती. एक (क्षत्रिय) राजा आणि एक कोळी ब्राह्मण होतो त्यांनाही तो परधर्मच होता. परधर्म attractive वाटला तरी तो भयावह का म्हटले आहे ? कारण आपला मूळ स्वभाव सोडून त्या धर्माचे अनुकरण करणे ह्यात अतोनात कष्ट असतात. ते न झेपणारे असतात. मग अशी उदाहरणे अपवाद असणारच. आणि ह्या दोन्ही उदाहरणात त्या दोघांनी काहीच कष्ट न घेता परधर्मात पदार्पण केले असे म्हणायचे असले तर मला काहीच म्हणायचे नाही.
दुसरा मुद्दा - वर्णाश्रमाची डोके, स्कंध, पोट (वा मांड्या) पाद इथून उत्पत्ती झाली असे जे "पुरुषसूक्तात" म्हटले आहे ते शरीरातील कोणत्या भागापासून कोणता वर्ण समजावा हे त्या अवयवाच्या महत्त्वाचे रूपक म्हणून वापरले आहे. ह्याच्याशी मी सहमत असेनही नसेनही. हे माझे मत आहे असा माझा दावा नाही की ते जे वर्णन आहे ते बरोबरच आहे असेही माझे म्हणणे नाही. कारण ब्राह्मणाला डोके असते व वैश्य फक्त पोटापुरताच विचार करतो, आणि शूद्राची जागा तर पायतळीच असा पुरुषसूक्ताच्या विधानावरून अर्थ निघतो असे मला म्हणायचे आहे हा आक्षेप होणारच. उगाच त्यांनी असे म्हटले असे मला वाटले म्हणून आक्षेप होऊ नये ह्यासाठी हे स्पष्टीकरण.