माझे गुणाविषयीचे मत ग्राह्य ठरले असताना पुन्हा प्रतिसादाच्या भोवऱ्यात गरगर फिरण्याची आवश्यकता नसतानाही धर्म हा वर्णाशी संबंधित नसून वृत्तीशी कसा निगडित आहे याविषयी एकनाथ महाराजांचे एक उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे हे निदर्शनास आणण्यासाठी पुन्हा ते धाडस करतो. 
               एकनाथ महाराजानी पूजेचे(गंगेची कावड) पाणी गाढवाला पाजल्याची,अस्पृश्याच्या मुलाला अंघोळ करून येताना कडेवर घेऊन त्याला शांत केल्याची दोन उदाहरणे श्रेष्ठ मानव(ब्राह्मण नव्हे)धर्म (वृत्ती) जपण्याचा त्यांचा आदर्श आपल्याला दाखवतात. तसेच आपल्या वडिलांच्या श्राद्धाला अस्पृश्य मंडळीना बोलावल्याचेही उदाहरण प्रसिद्ध आहे.विंचवाचे उदाहरण तर त्याहूनही आश्चर्यकारक आहे.कदाचित बऱ्याच जणाना ते माहीत असेलच पण त्यावरून आपला धर्म जो मानवधर्म तो जपण्याचा त्यांचा अट्टाहास स्वधर्मे निधनं श्रेयः या उक्तीची आठवण करून देतो. एकनाथ महाराज अंघोळीला गेले असताना ते पाण्यात पडलेल्या विंचवाला काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विंचू नांगी मारत असल्यामुळे त्यांच्या हातातून निसटून पाण्यात पडत आहे आणि पुन्हा ते त्याला बाहेर काढत आहेत हे पहाणारा दुसरा गृहस्थ एकनाथांना "हा काय वेडेपणा चालला आहे?"असे विचारतो त्यावर नाथ उत्तर देतात ,"तो (विंचू) त्याचा धर्म (नांगी मारण्याचा)पाळत आहे तर मला माझा धर्म (मानवधर्म -त्याचे प्राण वाचवण्याचा)पाळायला नको का?" 
       (बरेच मनोगती आपला प्रतिसाद देण्याचा धर्म त्याच जिवाच्या कराराने पाळतात - मनोगतीनो ह̱. घ्या.)