भावना पोहोचवण्यासाठी अभिव्यक्ती तितकीच महत्त्वाची आहे असे वाटते.
सणासमारंभाला पुरणपोळी खाल्ली असेलच. पुरणपोळी कच्ची, करपलेली जळालेली, बेचव, अगोड, दडस-पुरणामुळे किंवा आणखी कुठल्या प्रकारे बिघडली/बिनसली असेल तर ती घशाखाली उतरते का? तिथे पदार्थ बनवणाऱ्याची 'पुरणपोळीची भावना' गोड मानून घेता का? जर का याचे उत्तर नकारार्थी असेल तर अभिव्यक्ती ही भावनेइतकीच महत्त्वाची आहे असे वाटते.
जगात देशभक्तीपर काव्ये कोणी लिहिली-गायलीच नाहीत की काय? पण 'ने मजसी ने' ऐकताच डोळ्याच टचकच पाणी (किमानपक्षी गलबलून) येण्यास सावकरांची आणि संगीतकार/गायकांची अभिव्यक्ती कारणीभूत आहे असे वाटत नाही काय?